पिलीभितजवळच्या एका खेड्यात तीन हिंदू तरुणींवर बलात्कार झाला. तो अल्पसंख्याक तरुणांनी केला. पोलीस तक्रार घेत नव्हते. वरुण गांधींनी तेथे जाऊन तरुणींचे सांत्वन केले व त्यांची फिर्याद घ्यायला लावली. या प्रकारानंतर जर त्यांनी हिंदू धर्मीयांवर अन्याय सहन करणार नाही, अन्याय करणाऱ्यांचे हात छाटून टाकीन असे म्हणण्यात गैर काय?
मोहनदास करमचंद गांधी आणि जवाहरलाल मोतीलाल नेहरू या दोन व्यक्तींविषयी माझ्या मनात लहानपणीच शाळेत आदरभाव कोंबण्यात आला होता। महाविद्यालयात गेल्यावर आणि स्वतंत्र वाचन, विचार सुरू केल्यावर या दोन व्यक्तींविषयीचा आदरभाव तर संपलाच, उलट घृणा निर्माण झाली। या दोन व्यक्ती म्हणजे स्वतंत्र भारताला मिळालेले शाप आहेत, इथपर्यंत माझी धारणा झाली। या दोघांच्या वंशावळीचेही तसेच. हरिदास मोहनदास गांधी हे नाव एकदम का पुसले गेले. राजमोहन गांधींचे मॉरल रिआर्नामेंट ही काय भानगड आहे. सगळा उजेड आहे. नेहरूंचेही तसेच. एडविना माऊंटबॅटन, जयंती तेजा ही प्रकरणे काय सांगतात. इंदिरा गांधींनी आणीबाणी का आणली ? रेल्वेमंत्री ललित नारायण मिश्रा अचानक कसे दगावले? राजीव गांधींचे बोफोर्स प्रकरण, सोनिया, राहुल यांचा विचारच करायला नको. थोडक्यात गांधी नावाच्या, पण नेहरू वंशाच्या एकाही व्यक्तीबद्दल मला कधी आदर वाटला नाही, मात्र आता या भूमिकेला प्रथमच तडा गेला आहे. या गांधी घराण्यातील संजय-मेनका पुत्र वरुण यांनी मला जिंकले आहे. गांधी घराण्यातील एक तरुण मी हिंदू आहे आणि मला त्याचा अभिमान आहे असे अजूनही म्हणतो यातच सर्व आले.
17 मार्चला विविध वृत्तवाहिन्यांवर त्यांचे 5 मार्चचे भाषण दाखवले गेले. सबसे तेज म्हणवून घेणाऱ्यांनीही 12 दिवसांपूर्वीचे शिळे भाषण दाखवले. "चला जग जिंकू या' म्हणणाऱ्या दिवट्या चॅनललाही 12 दिवस ही सीडी कोठे होती याची चौकशी करावीशी वाटली नाही. प्रमोद मुतालिक, प्रवीण तोगडिया, रामदेवबाबा अशा हिंदुत्वाला बळकटी आणणाऱ्या नेत्यांना झोडपून काढण्यात धन्यता मानणाऱ्या काही चॅनल्सना ही सीडी म्हणजे घोड्यापुढे तोबऱ्याची पिशवी ठेवल्यावर जसा आनंद होतो तसा आनंद झाला. 12 दिवसांनी सीडी वितरित करण्यात काही तरी गोम असली पाहिजे, अशी शंका एकाही चॅनलवाल्यास आली नाही.
सीडी विलंबाने देण्याने काय फरक पडतो ते राजदीप सरदेसाई या पत्रकारानेच दाखवून दिले आहे. अणुकराराच्या वेळी अमरसिंह हे पैसे वाटत होते. त्याचे स्टिंग ऑपरेशन करायचे भाजपाने ठरवले. राजदीप त्याला तयार झाला. कॅमेरे बसवले गेले. चित्रीकरण झाले. 3 खासदारांनी अमरसिंहांकडून मिळालेले पैसे लोकसभेत आणले. त्याचवेळी स्टिंग ऑपरेशनची सीडी आय.बी.एन.वर दाखवायची हे ठरले होते, पण राजदीप आणि त्या चॅनलने ऐनवेळी शेपूट घातली. 15 दिवसांनी सी.डी. वितरित केली, ज्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. सीडीवर असे होत्याचे नव्हते आणि नव्हत्याचे होते असे संस्कार करता येतात.
मूळ मुद्दा वरुण गांधी हे काय बोेलले हे आहे. ज्याला निवडणूक आयोग आक्षेपार्ह म्हणते आणि ज्याचा इन्कार वरुण यांनी केला आहे, ती वाक्ये आपण सोडून देऊ, मात्र मी हिंदू आहे, त्याचा मला अभिमान आहे या वाक्यावर वरुण ठाम आहे. याबद्दल तरी त्याचे अभिनंदन ! एकीकडे त्यांचे काका (राजीव गांधी) मिझोराममधील प्रचारात बायबलवर आधारित राज्य आणू असे जाहीर सभेत म्हणत होते. त्यांच्या चुलत बहिणीने (प्रियंका) रॉबर्टशी लग्नही केले आहे. या पार्श्वभूमीवर कपाळाला टिळा लावून जय श्रीरामच्या जयघोषात गांधी घराण्यातील तरुणाने हिंदुत्वाच्या अभिमानाची घोषणा करावी हे निश्चित आनंददायक वृत्त आहे. पिलीभितजवळच्या एका खेड्यात तीन हिंदू तरुणींवर बलात्कार झाला. तो अल्पसंख्याक तरुणांनी केला. पोलीस तक्रार घेत नव्हते. वरुण गांधींनी तेथे जाऊन तरुणींचे सांत्वन केले व त्यांची फिर्याद घ्यायला लावली. या प्रकारानंतर जर त्यांनी हिंदू धर्मीयांवर अन्याय सहन करणार नाही, अन्याय करणाऱ्यांचे हात छाटून टाकीन असे म्हणण्यात गैर काय? सेक्युलॅरिझम म्हणजे हिंदू तरुणींवरील बलात्काराकडे दुर्लक्ष असा जर अर्थ असेल तर असला सेक्युलॅरिझम कार्पोरेशनच्या सार्वजनिक संडासाच्या सेफ्टी टॅंकमध्ये टाकून द्यायला हवा. असल्या विकृत सेक्युलॅरिझमला न भुलता वरुण गांधी यांनी मी आणि देशातील कित्येक कोटी हिंदूंच्या मनातील भावना बोलकी केली आहे.
या संदर्भात मला तीन महिन्यांपूर्वीची मराठवाड्यातील एक घटना आठवते. आपल्या घरासमोर शौचाला बसलेल्या मुलास घरात राहणाऱ्या गृहस्थाने हटकले "इथे हागायला बसू नको. लांब जा.' एवढेच सांगितले. मुलगा अल्पसंख्य होता. त्याने बापाला सांगितले. बाप लगेच हातात धारदार शस्त्र घेऊन आला आणि मुलास घराजवळ हागायला मनाई करणाऱ्यास भोसकून ठार मारले. ही घटना काय सांगते. उद्या घरात येऊन हागले तरी अल्पसंख्य म्हणून सहन करायचे? सेक्युलॅरिझम आहे म्हणून ? एकीकडे हिंदू तरुणींचे शील भ्रष्ट होते, क्षुल्लक कारणावरून हिंदू प्राणास मुकतात. याचा संताप व्यक्त करताना एखादा शब्द वावगा निघाला असलाच, तर त्यात एवढा गहजब करण्यासारखे काय आहे. जे घडले ते संतापजनक असेल तर त्यावरील भाष्य संयमित कसे असेल. इंदिरा गांधींची एका शिखाकडून हत्या झाल्यावर दिल्लीत हजारो शिखांची कत्तल झाली. त्यावर राजीव गांधी म्हणाले, "मोठा वृक्ष कोसळल्यावर जमीन हादरणार?'. वांशिक हत्याकांडाचे एवढे उघड समर्थन असूनही निर्वाचन आयोगाने काय दखल घेतली. त्यावेळी शब्द न पाहता त्यामागची भावना लक्षात घेतली गेली, तर तोच न्याय वरुण गांधींनाही हवा. वरुण गांधींनी मोहनदास गांधी यांच्या तत्त्वज्ञानाची खिल्ली उडवली. एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करा हे गांधी तत्त्वज्ञान कितीजणांना मान्य आहे, हे प्रत्येकाने स्वत:ला विचारावे. पाकिस्तानने आपली दोन्ही थोबाड फोडून लाल केली तरी आपण गप्प, याचा तुम्हाला राग येत नाही. दुसरा गाल पुढे करा असे सांगण्याचा जसा मो.क. गांधी यांना अधिकार आहे तसेच मारणाऱ्याचा हात तोडा असे सांगण्याचा वरुण संजय गांधी यांनाही अधिकार आहेच. गांधी तत्त्वज्ञान फेटाळल्याने गांधींचा उपमर्द कसा होतो? या विषयावर बोलण्याचा एकाही कॉंग्रेसवाल्यास अधिकार नाही, कारण स्वातंत्र्य मिळाल्यावर "कॉंग्रेस पक्ष विसर्जित करून टाका' असे गांधी म्हणत होते. त्या न्यायाने कॉंग्रेसचे आजचे अस्तित्व हेच मुळी गांधींच्या इच्छेविरुद्ध आहे.
आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार हा प्रश्न आहे. वरुण गांधींकडून आदर्श आचारसंहितेचा भंग झाला असे म्हणतात. एखाद्या समुदायाला धमकी देणे हा जसा आचारसंहितेनुसार गुन्हा आहे तसाच सत्तारुढ व्यक्तीने एखाद्या समुदायाला प्रलोभन दाखवणे हाही गुन्हाच आहे. वरुण गांधींनी मुस्लिम समुदायाला धमकावले असेल, तर शरद पवारांनी धनगर समाजाला आरक्षणाचे प्रलोभन दाखवले आहे. धमकावणे वा प्रलोभन हे दोन्ही समान गुन्हे आहेत. वरुण गांधी यांच्याबाबत निर्णय घेताना निर्वाचन आयोगाने शरद पवारांच्या बाबतीतही तसाच निर्णय घेतला पाहिजे. वरुणची ही पहिलीच निवडणूक आहे. तो अपात्र ठरवला गेला तर राजकारणात फार फरक पडणार नाही. पिलीभितला मेनका गांधी पुन्हा उभ्या राहतील. नि:पक्ष समजल्या जाणाऱ्या निर्वाचन आयोगाला मग शरद पवारांनाही निवडणुकीस अपात्र ठरवावे लागेल. त्याचे परिणाम काय होतील हा एक स्वतंत्र विषय आहे.